परभणी कृषी विद्यापीठ परिसरात अजगराने केली हरणाची शिकार
परभणी कृषी विद्यापीठ परिसरात अजगराने केली हरणाची शिकार
Published
परभणीच्या कृषी विद्यापीठ परिसरातील शेंद्रा शिवारात अजगराने हरणाची शिकार केलीय. हा अजगर 15 फुटांचा असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.
सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे पाण्याच्या शोधात असलेलं हरीण या अजगराच्या तावडीत सापडलं.
या अजगराला वन विभागाने निर्जन स्थळी नेऊन सोडावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






