कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तुफान पाऊस बरसणार? महाराष्ट्रातील 'हे' जिल्हे अलर्टवर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, छाया काविरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
मान्सून ब्रेकमुळे गेल्या काही दिवसांपासून बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे.
मुसळधार पावसानंतर मुंबईसह कोकणातही उन्हाचा चटका आणि अंगाची लाही लाही करणारा घाम यामुळे नागरिक हैराण झालेत. अशातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून राज्यात पुन्हा जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे.
पुढचे काही दिवस कुठे कुठे पाऊस बरसणार आहे? आणि कुठे कुठे उकाडा असणार आहे? जाणून घेऊयात.
कुठे कसं हवामान असणार?
येत्या 24 ते 48 तासांत राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 2 दिवसांसाठी विदर्भ-मराठवाड्याच्या बहुतांश भागांसह राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केलाय.
आषाढी एकादशीच्या आधीच वरुणराजा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या, तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. पण हा पाऊस पुरेसा नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.

फोटो स्रोत, IMD
आता मात्र, बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तुफान पावसाची शक्यता आहे.
कुठे कोणता अलर्ट?
आता हवामान खात्याने 18 जुलै आणि 19 जुलै या 2 दिवसांमध्ये नक्की कुठे कोणता अलर्ट दिला आहे हे समजून घेऊयात.
यलो अलर्ट (18 जुलै)
- पुणे
- सातारा
- सोलापूर
- अहिल्यानगर
- संभाजीनगर
- जालना
- बीड
- धाराशीव
- लातूर
- परभणी
- नांदेड
- हिंगोली
- यवतमाळ
- अमरावती
- नागपूर
- वर्धा
- गोंदिया
- भंडारा
- चंद्रपूर
- गडचिरोली

फोटो स्रोत, IMD
यलो अलर्ट (19 जुलै)
- पुणे जिल्हा (घाटपरिसरासह)
- अहिल्यानगर
- बीड
- परभणी
- हिंगोली
- अमरावती
- वर्धा
- नागपूर
- गोंदिया
- भंडारा
- चंद्रपूर
- गडचिरोली
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























