You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात तयार होणारे 'हीट आयलंड' किती धोकादायक? - ग्राऊंड रिपोर्ट
पुण्यात 29 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता एरंडवणातल्या डीपी रोडवर हवेचं तापमान 38°C होतं. पण त्याच वेळी सिमेंट रस्त्याच्या पृष्ठभागाचं तापमान 58°C पेक्षा जास्त नोंदवलं गेलं.
एका अभ्यासानुसार शहरातले सिमेंट रस्ते, कमी होत जाणारी झाडं, वाहनांची गर्दी आणि काँक्रिटच्या इमारती शहराचं तापमान वाढवत असल्याचं दिसून आलं.
यालाच Urban Heat Island Effect म्हणजेच शहरातल्या उष्णतेची बेटं तयाक होतात असं म्हटलं जातं. म्हणजे शहरात काही भाग आसपासच्या ग्रामीण भागांपेक्षा अधिक तापू लागतात.
या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो तो रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांना. फेरीवाले, टपरी चालक आणि पथारी व्यवसायिकांना.
- रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
- शूट- नितीन नगरकर
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)