BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अमेरिकेचं एक असं विमान जे अण्वस्त्र हल्ल्यातही सुरक्षित राहून सलग 7 दिवस न थांबता उड्डाण करू शकतं
या विमानाला 'डूम्सडे प्लेन' असंही म्हणतात. हे विमान सलग 7 दिवस थांबता न उडू शकते. दीर्घकाळ आकाशात राहून हे लष्करी कारवायांना मदत करण्यास सक्षम आहे.
आशा भोसले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू, नात जनाईने काय माहिती दिली?
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती बीबीसी मराठीला दिली आहे.
अमेरिका-इराणमधील शांतता चर्चा फिस्कटली; जेडी व्हेन्स पाकिस्तानमधून अमेरिकेकडे रवाना, नेमकं काय म्हणाले?
"अमेरिका आणि इराण यांच्यात कोणताही करार झालेला नाही", अशी माहिती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी दिली.
पाकिस्ताननं अमेरिका-इराण यांच्यात चर्चा कशी घडवून आणली, नेमकं काय काय घडलं?
या चर्चेसाठी इस्लामाबाद पूर्णपणे सज्ज आहे. रस्त्यांवर शांतता आहे, कारण जवळपास 10 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं आहे. या चर्चेद्वारे जगासाठी बरंच काही पणाला लागलं आहे.
इराण युद्धातून अमेरिकेला हवं असलेलं उद्दिष्ट साध्य करण्यात यश आलं का? त्यांना काय किंमत मोजावी लागली?
शस्त्रसंधी लागू झाली आहे. मग प्रश्न निर्माण होतो की अमेरिकेनं यातून प्रत्यक्षात काय साध्य केलं? यासाठी किती किंमत मोजावी लागली?
पाठीवर झोपून बाळ जन्माला घालणं किती धोकादायक? प्रसूतीसाठी का वापरली जाऊ लागली ही पद्धत?
जगभरात हजारो वर्षांपासून महिला उभ्या राहूनच किंवा शरीर उभ्या, सरळ अवस्थेत ठेवूनच बाळाला जन्म देत असत. मग, आज अनेक महिला पाठीवर झोपलेल्या स्थितीत बाळाला जन्म का देतात?
दरोड्याबद्दल पत्नीचा व्हीडिओ झाला व्हायरल, नंतर पतीच्या हत्येच्या आरोपात तिलाच अटक, नेमके काय घडले?
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात 7 एप्रिलला मिरची व्यापारी देवकरण पुरोहित यांच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांची पत्नी प्रियंका पुरोहितला अटक करण्यात आली आहे.
'आई व्हायलाच हवं' या दबावाची किंमत किती? मातृत्वासाठी 'कोणताही मार्ग' निवडण्यामागची कारणं काय?
11 एप्रिल ला 'कस्तुरबा गांधी' यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात 'सुरक्षित मातृत्व दिवस' साजरा होतो. मातृत्व म्हणजे कोणत्याही वयातील गर्भधारणा व त्यासाठीचे प्रयत्न, गर्भारपण, प्रसूती, बाळंतपण आणि गर्भपातही. मातृत्वाच्या या सर्वच टप्प्यांवर स्त्रीला शारीरिक, मानसिक, भावनिक सुरक्षित अनुभव मिळायला हवा.
माणूस कधीही पोहचलेला नाही इतक्या अंतरावर जाऊन अंतराळवीरांना काय दिसलं, पाहा हे रोमांचक 13 फोटो
नासाची महत्वकांक्षी आर्टेमिस – 2 मोहीम पूर्ण झालीय. ओरायन स्पेसक्राफ्ट 11 एप्रिल 2016 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास अमेरिकेतील सॅन डिएगोच्या समुद्री तटावर उतरलं आहे.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'मीच एक बॉम्ब असतो तर'; लेबनॉन इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर आबिद काय म्हणाले?, वेळ 2,04
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
व्हीडिओ, समय रैनाचं 'लेटंट' परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज, वेळ 1,55
India’s Got Latent चा दुसरा सीजन येतोय. सध्या तुमच्या सोशल मीडियावरही समय रैनाचे रील्स सतत येत असतील.
व्हीडिओ, अहमद मिर्झा : महाराष्ट्रातल्या कुस्तीच्या आखाड्यात रमलेला इराणी पैलवान; भारताबद्दल तो काय म्हणाला?, वेळ 4,19
इराणमध्येही कुस्तीची मोठी परंपरा आहे. तिथेही आखाड्यातली कुस्ती होते. पण मिर्झा यांच्या मते या दोन्ही देशांतील आखाडा कुस्ती वेगवेगळी आहे.
व्हीडिओ, आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?, वेळ 4,08
नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.
व्हीडिओ, 'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?, वेळ 4,27
नाशिकची संपूर्णम सेवा फाऊंडेशन ही संस्था देवांच्या भंगलेल्या मूर्ती, फोटो रिसायकल करण्याचं काम करते. 2019 साली सुरू झालेल्या या संस्थेने आतापर्यंत जवळपास 10 लाख फोटो, मूर्ती रिसायकल केल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
व्हीडिओ, इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?, वेळ 4,00
इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करताना दोन्हीकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.






































































