नेपाळमध्ये पुराचं रौद्ररूप; अर्धा पूल वाहून गेला, ड्रोनमधून दिसली भीषण दृश्यं

नेपाळमधील भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नुवाकोटमध्ये मोठा विध्वंस झाला. 26 ऑगस्ट 2026 रोजी ड्रोनमधून घेतलेले हे दृश्य.

फोटो स्रोत, Ambir Tolang/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, नेपाळमधील भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नुवाकोटमध्ये मोठा विध्वंस झाला. 26 ऑगस्ट 2026 रोजी ड्रोनमधून घेतलेले हे दृश्य.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

नेपाळच्या भोटे कोशी नदीला बुधवारी (26 ऑगस्ट) अचानक आलेल्या पुरामुळे 3 जिल्ह्यांमध्ये मोठा विध्वंस झाला. या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 157 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांचे जवान आणि परदेशी पर्यटकांसह अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत.

या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अलीकडच्या काळात नेपाळवर ओढावलेल्या सर्वात भीषण आपत्तींपैकी एक म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

भूस्खलनामुळे भोटे कोशी नदीची उपनदी ल्हेन्देचा प्रवाह अडवला गेला आणि त्यानंतर पूर आला.

त्यानंतर पुराचं पाणी चीनच्या सीमेजवळ असलेल्या रसुवागढी परिसरातील तिमुरे भागात आधी पोहोचलं.

शेकडो लोक राहत असलेल्या या परिसराचा मोठा भाग हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यानंतर पुराचं पाणी वेगाने खालच्या दिशेने वाहत गेलं.

ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात त्रिशूली नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीकाठच्या भागात झालेला मोठा विध्वंस दिसत आहे. पुरामुळे येथील घरं आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

फोटो स्रोत, Skanda Gautam/SOPA Images/LightRocket via Getty Images

फोटो कॅप्शन, ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात त्रिशूली नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीकाठच्या भागात झालेला मोठा विध्वंस दिसत आहे. पुरामुळे येथील घरं आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

या भागात पावसाचा कोणताही अंदाज नव्हता. त्यामुळे पूर आला तेव्हा लोक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त होते.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, "391 परदेशी नागरिक आणि 44 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत."

नेपाळ पर्यटन मंडळाने टूर ऑपरेटर्सच्या हवाल्याने सांगितलं की, बेपत्ता भारतीयांपैकी बहुतांश जण कैलास मानसरोवर यात्रेला जाणारे भाविक होते.

26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या घरांमध्ये आणि रस्त्यांवर पुराचं पाणी साचलेलं दिसत आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, 26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या घरांमध्ये आणि रस्त्यांवर पुराचं पाणी साचलेलं दिसत आहे.

नेपाळच्या गृह मंत्रालयाने एका निवेदनात सांगितलं की, रसुवागढी, तिमुरे, स्याफ्रुबेसी आणि मैलुंग या पूरग्रस्त भागांमध्ये लष्कराच्या आणि खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे.

मंत्रालयाने सांगितलं की, सरकारने या पूरग्रस्त जिल्ह्यांना पुढील 3 महिन्यांसाठी 'आपत्ती-प्रवण क्षेत्र' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्रमंत्री खानाल यांनी सांगितलं की, रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे 'राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती' निर्माण झाली आहे.

26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळच्या नुवाकोटमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं. पुरामुळे घरं, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

फोटो स्रोत, Ambir Tolang/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, 26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळच्या नुवाकोटमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं. पुरामुळे घरं, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात 27 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली नदी परिसरात अचानक आलेल्या पुरामुळे चिखलाने वेढलेली घरं दिसत आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात 27 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली नदी परिसरात अचानक आलेल्या पुरामुळे चिखलाने वेढलेली घरं दिसत आहेत.
ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात पुरानंतर त्रिशूली नदीच्या काठावर झालेलं मोठं नुकसान दिसत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे इमारती आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. वरच्या भागातील ल्हेन्दे नदीत तिबेटच्या परिसरात बर्फ आणि दगडांचं भूस्खलन झाल्यामुळे अचानक हा पूर आला.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात पुरानंतर त्रिशूली नदीच्या काठावर झालेलं मोठं नुकसान दिसत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे इमारती आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. वरच्या भागातील ल्हेन्दे नदीत तिबेटच्या परिसरात बर्फ आणि दगडांचं भूस्खलन झाल्यामुळे अचानक हा पूर आला.
भोटे कोशी आणि त्रिशूली नद्यांच्या काठावरील भागात अजूनही धोका कायम आहे. नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन जिल्ह्यांतील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, भोटे कोशी आणि त्रिशूली नद्यांच्या काठावरील भागात अजूनही धोका कायम आहे. नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन जिल्ह्यांतील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे पुलाचा काही भाग तुटला आहे.

फोटो स्रोत, Sunil Pradhan/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, 26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे पुलाचा काही भाग तुटला आहे.
नेपाळ-चीन सीमेजवळील अनेक सखल भाग या पुरामुळे प्रभावित झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु, सध्या नुकसानीचा नेमका आकडा सांगणं शक्य नाही.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, नेपाळ-चीन सीमेजवळील अनेक सखल भाग या पुरामुळे प्रभावित झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु, सध्या नुकसानीचा नेमका आकडा सांगणं शक्य नाही.
भोटे कोशी नदीच्या काठावर असलेल्या रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक वस्त्यांना पुराचा सर्वाधिक फटका बस ला आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, भोटे कोशी नदीच्या काठावर असलेल्या रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक वस्त्यांना पुराचा सर्वाधिक फटका बस ला आहे.

2015च्या विनाशकारी भूकंपानंतर नेपाळवर ओढावलेली ही सर्वात भीषण आपत्ती मानली जात आहे. त्या भूकंपात सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)