हातात धनुष्य घेतलं आणि या आदिवासी विद्यार्थ्यांचं आयुष्य बदललं
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
इंडियन आर्चरी म्हणजेच भारतीय तिरंदाजी वर्ध्या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. हा खेळाचं प्रशिक्षण देणारे दीपक वनवे यांना आपलं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण करायचं होतं.
फार खर्चिक असलेला खेळ त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला. वर्ध्याच्या वाढोणा गावात ही शाळा आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंदाजीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
रिपोर्ट आणि शूट - शाहीद शेख
व्हीडिओ एडिट - निलेश भोसले




















