विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, महाराष्ट्रात बिनविरोधचा ट्रेंड का वाढतोय?
विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, महाराष्ट्रात बिनविरोधचा ट्रेंड का वाढतोय?
Published
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागांचा निकाल बिनविरोध लागला आहे. हे सर्व 6 आमदार महायुतीचे आहे.
गुरुवारी या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं निवडणुका बिनविरोध व्हाव्या म्हणून सर्वच उमेदवारांनी चांगलेच प्रयत्न केले.
त्यापैकी सहा उमेदवारांना यश आले. पण या बिनविरोध निवडणुकांमुळं महाराष्ट्रात बिनविरोध निवडणूक नियम बनत चाललाय का? असा प्रश्न निर्माण झालाय.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी या बिनविरोध निवडणुकीबाबत दिलेली महत्त्वाची माहिती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






