ग्राऊंड रिपोर्ट : रायगडच्या कातकरी समाजातील सपना वाघमारे उच्चशिक्षणासाठी लंडनला जाणार
ग्राऊंड रिपोर्ट : रायगडच्या कातकरी समाजातील सपना वाघमारे उच्चशिक्षणासाठी लंडनला जाणार
Published
आता तिची पुढची वाटचाल थेट लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी होतेय.
आई-वडील मजुरीसाठी स्थलांतरित होतात. बालपणी आश्रमशाळा. शिक्षणासाठी संघर्ष. कधी नोकरी, कधी वडापाव खाऊन दिवस काढत तिने शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून LLB पूर्ण केल्यानंतर आता तिला इंग्लंडमधील प्रतिष्ठित विद्यापीठामधून LLM साठी ऑफर आली आहे.
जिथे आजही हजारो कुटुंबं ऊसतोड, वीटभट्टी आणि स्थलांतरित मजुरीवर अवलंबून आहेत. जिथे अनेक मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं. जिथे बालविवाह, व्यसनाधीनता आणि महिलांवरील अत्याचार हे मोठे प्रश्न भेडसावताय.
अशा आदिवासी समाजातून सपना पुढे आली आहे. सपना म्हणते, 'मी शिकले नसते तर मलाही ऊसतोडीसाठी जावं लागलं असतं.'
एका आदिवासी मुलीचा हा प्रवास अनेक मुलींना आणि मुलांनाही शिक्षणाची नवी प्रेरणा देणारा आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन





