मनोज जरांगेंनी 'ती' ऑडिओ क्लिप ऐकवली आणि महायुतीत वातावरण तापलं

व्हीडिओ कॅप्शन, मनोज जरांगे पाटील, 'सलग तीन वर्षांपासून आजपर्यंत माझ्या विरोधात षडयंत्र सुरू'
मनोज जरांगेंनी 'ती' ऑडिओ क्लिप ऐकवली आणि महायुतीत वातावरण तापलं
Published

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगत त्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला.

मराठा समाजाची आणि आंदोलनाची बदनामी करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून चौकशी केली जावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)