Video : अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी विमानातूच ताब्यात घेतलं तो क्षण
दिल्लीत आज (10 ऑक्टोबर) कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेतल्याचं सीजेपीनं म्हटलं आहे.
पक्षानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, दिल्ली पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या कारवाईचा उद्देश आजच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या नेतृत्वाला आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ करणे हा आहे, असं म्हटलं आहे.
सीजेपीने याला नागरिकांच्या मुक्त संचाराच्या अधिकाराचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले असून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.
ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपक म्हणाले की, त्यांना अटकेची भीती वाटत नाही आणि ते त्यासाठी तयार आहेत.
दिपक म्हणाले , "देश कोणत्या दिशेने जात आहे हे तुम्ही पाहू शकता. आम्हाला विमानातच ताब्यात घेतले जात आहे, इंदिरा गांधींनीसुद्धा असे कधी केले नव्हते. ही हुकूमशाही आहे, पण आम्ही त्यांना घाबरत नाही."
अभिजीत दिपके अटक करायला आलेल्या पोलिसांना म्हणाले, "आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही अटकेसाठी तयार आहोत."



