'इलेक्शन चोरीचा पुरावा द्या', राहुल गांधी आणि राष्ट्रपतींच्या बैठकीत काय घडलं?
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे आभार मानले. तसेच आपली भूमिका स्पष्ट केली.
या भेटीआधी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभा घेतली आणि राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढला.
विरोधी पक्षांचा आरोप आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्या मते, एसआयआरमध्ये मतदारांचे हक्क हिसकावून घेतले जात आहेत आणि मते चोरली जात आहेत. त्यांनी ज्ञानेश कुमार आणि भाजप यांच्यात संगनमत असल्याचाही आरोप केला आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचे हे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, जे लोक स्थलांतरित झाले आहेत, ज्यांनी आपले पत्ते बदलले आहेत किंवा ज्यांचे निधन झाले आहे, त्यांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी एसआयआरचा वापर केला जात आहे.
दरम्यान, भाजपचा आरोप आहे की, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष निवडणूक आयोगाची बदनामी करून देशाच्या लोकशाहीला कमजोर करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






