टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींना आणलं मुंबईत

व्हीडिओ कॅप्शन, टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींना आणलं मुंबईत
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींना आणलं मुंबईत
Published

टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी कोट्याहून मुंबईत आणलं आहे. फूल सिंह, हृतिक कुमार आणि रेहान अशी आरोपींची नावं आहेत.

जीटी रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना मुंबई खंडणी विरोधी पथकाच्या युनिटमध्ये आणण्यात आलं.

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह अतिरिक्त पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजस्थानमधील कोटा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीसाठी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

मुंबई क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की, "तीन आरोपींचे वय 18 ते 22 वर्षांच्या दरम्यान आहे. त्यापैकी दोघे हरियाणातील सोनीपतचे, तर एक जण बिहारचा रहिवासी आहे.

"तिघांपैकी दोघांनी बारावीपर्यंत, तर एकाने नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याबद्दलची तपासणी सुरू आहे. तिन्ही आरोपींपैकी कोणीही अल्पवयीन नाही," असं रोशन यांनी सांगितलं.