अफगाणिस्तानच्या या छोट्या 'मेस्सी' ला तालिबान का देतंय धमक्या
Published
2016 मध्ये मुर्तझा अहमद या सात वर्षींय मुलाचा फुटबॉल खेळतानाचा एक फोटो व्हायरल झाला. कारण त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीपासून मेस्सीच्या नावाचं एक टी-शर्ट तयार केला होता.
त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनल मेस्सीने त्याची प्रत्यक्षात भेटही घेतली होती. असं स्वप्न पूर्ण झाल्यानंतरही अहमदचं जीवन फार काही आरामात नाहीये.
वाढत्या हिंसाचाराचा तोही बळी ठरतोय आणि आता तर त्याला कट्टरवादी संघटना असलेल्या तालिबानकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. पण का?
पाहा हा व्हीडिओ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)