व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली

भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट व्हिएतनाममधील बेटाजवळ उलटली

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टद्वारे भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची माहिती दिली आहे.

दूतावासाने एक्सवर माहिती देताना म्हटलं, "व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे."

"या घटनेची अचूक माहिती गोळा केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून सध्या शोध आणि बचावकार्य सुरू आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

या बोटीमध्ये किती प्रवासी होते, याबाबत दूतावासाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

दूतावासाने सांगितलं की, बाधित कुटुंबीयांना माहिती आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी 'हो ची मिन्ह' शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासात एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे.

दूतावासाने काही हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत:

+84 36 281 7930

+84 91 552 37 14

+84 33 452 0414

या क्रमांकांवर संपर्क साधून कुटुंबीय आपल्या नातेवाईकांबाबत माहिती मिळवू शकतात.

याशिवाय, हनोई येथेही एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला असून, त्यासाठी +84 91 308 9165 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.

नोट - ही बातमी सातत्यानं अपडेट होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)