'कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाऊंटवर बंदी म्हणजे सिंहासन हाललं आहे'; योगेंद्र यादव काय म्हणाले?

'कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाऊंटवर बंदी म्हणजे सिंहासन हाललं आहे'; योगेंद्र यादव काय म्हणाले?
Published

सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी' या मीम पेजला मिळालेला वाढता प्रतिसाद आणि त्यानंतर सरकारने या ट्विटर अकाऊंटवर घातलेली बंदी, यावर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी बीबीसीशी संवाद साधला.

"त्यावर बंदी घालणं ही आता एका गंभीर बदलाची सुरुवात असू शकते," असं यादव म्हणाले.

देशातील तरुणांमध्ये असलेली निराशा, बेरोजगारी आणि व्यवस्थेबद्दलचा राग या मीमच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचं त्यांना वाटतं.

जगभरातील हुकूमशहांना विनोदांची सर्वात जास्त भीती वाटते, असं सांगत त्यांनी सरकारच्या कारवाईवर भाष्य केलं.

हा केवळ एक विनोद नसून, त्यामागे एक खोल राजकीय संदेश आणि तरुणांची आकांक्षा लपलेली आहे, असे मत योगेंद्र यादव यांनी या मुलाखतीत मांडले आहे.

मुलाखत - दिलनवाझ पाशा

व्हीडिओ - अरीबा अन्सारी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)