'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून इतका वाद का होतोय?
'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून इतका वाद का होतोय?
'ते वर गेले असतील तर तू ही वर जा' या शब्दांत 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर झाला.
एकनाथ शिंदेंच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण फोन करून या पुस्तकावर आक्षेप घेतला असल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय.
पण जिथे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे तिथे गायकवाड मात्र म्हणतात की, फोन रेकॉर्डिंगमधल्या काही शब्दांची मोडतोड केली गेलीय.
राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली आहे.
प्रशांत आंबी हे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असून 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या प्रकाशन आणि वितरणाचं काम ते पाहतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






